जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, December 16, 2009

त्यांना ऐकू गेलेच नाही...

दारामागे लपून खालमानेने
अस्तित्वाच्याच ओझ्याने
भितीने थिजल्या डोळ्याने
ती सांगत राहिली
माया मागत राहिली
पण
त्यांना ऐकू गेलेच नाही....

भिंतीभिंतीत आक्रोश भिनला
उशीतच डोह जन्मला
जखमी स्वर उसळला
पुन्हा उसासला
पण
त्यांना ऐकू गेलेच नाही....

फक्त तीच अशी होती
जी त्यांना कधीतरी काही
म्हणू-दाखवू शकत होती
डोहातला कचरा
पण
सारे घरच त्यांना धार्जिणे होते....
अन ते ताबेदार .....

दिवसा मागुनी दिवस गेले
डोळ्यांतली आसवे सुकली
भिंतींना भेगा पडल्या
उश्यागाद्या पिचल्या
बस.... आता बस....
दाराआडून उजेडात आली
किंचाळली
पण
आजकाल बाबांना जरा कमीच ऐकू येते.......

10 comments:

  1. मनाला स्पर्श करून, गात्र एकवटली सारी अशी ही तुझी कविता मला बाबां ची आठवण देती झाली. येत असेलही कमी ऐकू, पण तुझे मन तर वाचता
    येते न त्यांना. तुझ्या ह्या अलवार मनाला माझा सलाम, नमस्कार सांग आपल्या बाबांना....... कडा डोळ्याच्या ओलावल्या. धूसर झाले जग, जगते मी पण सहवासात बाबांच्या तुझ्याच कविते मधून.....

    ReplyDelete
  2. काय लिहू? माझे सगळे विचार बधिर झाले आहेत....

    ReplyDelete
  3. भावस्पर्शी!!!! खूप छान!!!

    ReplyDelete
  4. सही झालीय ... खास करून शेवट

    ReplyDelete
  5. अनुक्षरे तुझ्या भावनोत्कट प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  6. Manatun,मुठभर लोक सोडले तर आजही हा प्रश्न तसाच आहे. आभार.

    ReplyDelete
  7. प्रसाद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.:)

    ReplyDelete
  8. प्रकाश अनेक आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !