जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, July 22, 2009

आशीर्वाद

मायेचे पंख पसरून
बाळा मी तुला जवळ घेते
तुझ्या वाढदिवशी तुला
अनंत आशीर्वाद देते

अंतराचे बंधन प्रेमाला नसते
म्हणूनच मी सदैव तुझ्याजवळ असते
ही जवळीक तुलाही जाणवते का?
माझे अस्तित्व तुलाही कळते का?

नवा देश नवी भाषा तुला
आत्मसात करायची आहे
थोडे कठीण असले तरी
नेटाने पुढे जायचे आहे

निश्चय असला की
सारे काही जमतेच ना
चिखलातही सुंदरसे
कमळ उमलतेच ना?

तुझ्या गुणांचे कमळ
असेच सदा उमलू दे
तुझ्यासवे आमचेही
मन अभिमानाने भरू दे

आई बाबांचे प्रेम
सदैव तुला मिळावे
आजी आजोबांचे आशीर्वाद
नेहमीच पाठीशी असावे

असा आमचा बाळ
सदा सदगुणी राहावा
सगळ्यांसवे तो नेहमी
सुखी आनंदी राहावा.


5 comments:

  1. नवा देश नवी भाषा तुला ... आत्मसात करायची आहे. थोडे कठीण असले तरी ... नेटाने पुढे जायचे आहे.

    वा.. सुंदर... कोणाची कविता आहे ही??? आपण लिहिली आहे का???

    ReplyDelete
  2. फ़ारच छान !!

    ReplyDelete
  3. Hoy Rohan, mazich aahe kavita. aamhi ithe aalo tyaveli lihili hoti.

    Rohan, Mau anek aabhar.

    ReplyDelete
  4. अप्रतिम अंगाई लिहिलेली आहे. ऐकायला व वाचायलाही छान वाटली.

    ReplyDelete
  5. रविंद्र, स्वागत व आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !