जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, April 9, 2009

तू हैं सबका शिखर...

आजकाल हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच चांगली गाणी वर्षभरात ऐकू येतात. गाणी गाजणे आणि ती मनात रुतून बसणे ह्याचा ताळमेळ जमणारच नाही. जुन्या गाण्यांची मोहिनी, जागा अबाधित आहे आणि राहीलच. तरीही क्वचित अपघाताने काही सुंदर रचना जन्माला येते, हे गाणे असेच आहे.

नीले नीले आसमाँ मे तू हैं
नाजूक सी कलियों मे तू हैं
धरती की हलचल मे तू हैं
जीवन के हर पल मे तू हैं

हे ईश्वर तू जाने यहाँ क्या हैं किसका शिखर ॥ धृव ॥
तू हैं मन की शक्ती
आशा हैं सबकी
तूही सबका साथी रे

सूरज की गरमी मे तू हैं
हवाओं की नरमी मे तू हैं
बहते हूए झरनो मे तू हैं
पंछी की उडानो मे तू हैं
हाँ सब ढुढंते हैं अपना अपना शिखर

हे ईश्वर तू जाने यहाँ क्या हैं किसका शिखर ॥ धृव ॥

मानव की हर सांस तू हैं
पल पल की एक आँस तू हैं
सब दूर हैं पास तू हैं
जग धूप हैं छांव तू हैं
हम पहचाने कैसे निराकार तेरा शिखर
ये ईश्वर तू जाने यहॉ क्या हैं किसका शिखर
हे ईश्वर तू हैं सबकी राहो का सच्चा शिखर शिखर...

जगजीतजींनी गायलेली प्रार्थना आहे. २००५ मध्ये आलेल्या ' शिखर ' सिनेमातील या गीताचे कवी आहेत श्री. सुधाकर शर्मा व संगीतकार विजू शहा. सिनेमा आला आणि गेला. कधी कधी अश्या पडेल सिनेमांमध्ये अशी सुंदर गाणी सापडतात. प्रथम एकले तेव्हा छान वाटले परंतु तेवढे मनात घुसले नव्हते. तीन-चार दिवस दररोज एकले अन ह्या साध्या शब्दांची ताकद कळू लागली. संगीतकार आणि गायक ह्यांचा वाटाही मोठा आहेच. ही देवाची प्रार्थना, पहाट-सकाळ-दुपार...., दिवसाच्या कुठल्याही प्रहरी तितकीच ताकदीने मनाला भिडते, शांत करते.

मी हे गाणे नेहमी गाडीत लावते. त्यावेळी डोक्यात फार घोळ नसतात. लक्ष रस्त्यावर आणि मन जगजीतच्या तरल सुरांवर... तुम्ही हे गाणे एकले नसेल तर जरूर एका. शब्द, सुर, भाव एकत्रितपणे हृदयात उतरत जातील अन मन प्रसन्न होईल.


गाणे इथे एका: http://www.melodicsongs.com/playallsongs.html?songid=4521

2 comments:

  1. He gaane barech diwas shodhat hoto. Kharech atishay sunder shabda ani Jagjit cha aawaj. Thanks.
    Chaan lihita tumhi.

    ReplyDelete
  2. खूप खूप आभार, पारिजात.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !