थंडी आली की खूपश्या गोष्टी ओघानेच येतात. वातावरणात एक सुखद उल्हासदायी, चित्त उत्फुल्ल करणारा गारवा भरून असतो. नेहमीच, कुठल्याही वेळी तितकीच तरतरी देणाऱ्या चहाची महती काय ती वर्णावी. तरीही थंडीत सकाळी सकाळी झोपाळ्यावर झुलत आले, गवती चहा व वेलदोडा घालून केलेला चहा कोवळ्या उन्हात शाल लपेटून पिण्यातली लज्जत भारीच! कपाटात मागे ठेवलेले स्वेटर, शालींना त्या निमित्ते हवा लागते. थंडीत लग्नाचे आमंत्रण आले की मला खूप आनंद होतो. एरवी उकाड्याने जरीची साडी नेसली तरी तिचे सुखं मिळत नाही. थंडीत मात्र छान मिरवता येते.
उन्हाळ्यात घामाच्या धारांनी बेजार झाल्याने खाण्याची वासनाच कमी होऊन जाते. त्याचे सगळे उट्टे थंडीत पुरेपूर भरून काढता येते. हुरडा, निखार्यावर भाजलेले बटाटे, कांदे, ज्वारीबाजरीची गरम गरम भाकरी, लसणाची चटणी, वांग्याचे भरीत, वाफाळती कढी, खास खांदेशी झुणका, डाळबाटी... उंधियो, घरी बनवलेले पॉटमधले किंचित खारट खारट आइसक्रीम... यम्म! थंडीत नेमेची येणारा दिल्ली मटार... त्याच्या गरम गरम तिखटमिठाच्या करंज्या. अप्रतिम! संक्रांतीला तिळगुळाचे लाडू, गुळाची पोळी.. अहाहा!
अश्या या गुलाबी थंडीत गुलाबी रसाळ गाजरांची बाजारात लयलूट असते. एरवी पाणी मारून तजेला आणायचा प्रयत्न केलेली गाजरे कुठे आणि ही रसरशीत गाजरे कुठे. गेल्या आठवड्यात इंडियन स्टोअर मध्ये गेले तर समोरच होती. त्यांचा गुलाबी तजेला लक्ष वेधून घेत राहिला. मग काय आणावीच लागली. गाजर हालवा म्हटलं की मला अगदी लीला चिटणीस, निरुपा रॉयपासून रती अग्निहोत्री पर्यंतच्या सगळ्या ' माँ ' ओतप्रोत माया गाजर हलव्याच्या वाटीत भरून ' बेटा ' ला खिलवताना दिसतात. हिंदी सिनेमाच्या अतिरेकी ' गाजर हालवा झिंदाबाद ' मुळे कधीकधी जरा अतीच गुडीगुडी वाटणारा ' गाजर हालवा ' खरेच खास लागतो.
वाढणी :
मध्यम आकाराच्या आठ वाट्या... आता या आठ माणसेही खाऊ शकतात किंवा दोघेच मटकावू शकतात.
मी यावेळी गाजर हालवा पूर्णपणे मायक्रोव्हेव मध्ये केला आहे. म्हणून आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार व मायक्रो नुसारचीही कृती देतेय. मायक्रोमध्ये केल्यामुळे महत्त्वाचा फायदा : जळण्याची, खाली लागण्याची भीती शून्य. बॅचलर्सनाही सहज करता येईल अशी सुटसुटीत कृती.
साहित्य :
गुलाबी-लालसर रंगांची रसरशीत गाजरे एक किलो
चार चमचे तूप
पाव किलो साखर
दोन कप दूध किंवा एक वाटी खवा किंवा स्विटन कंडेंस मिल्क चा एक टीन
काजू, बदाम, बेदाणे, पिस्ते ( ऐच्छिक ) तीन चमचे
वेलदोड्याची पूड एक चमचा
कृती :
पारंपरिक :
गाजराचे साल काढून स्वच्छ धुऊन घेऊन किसावीत. जाड बुडाच्या भांड्यात तूप व गाजराचा कीस घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर दहा मिनिटे ठेवावा. झाकण काढून नीट हालवून पुन्हा दहा मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावा. दूध घेणार असाल तर कोमट दूध घ्यावे. फ्रीजमधले काढून घालू नये. दहा मिनिटांनी कोमट दूध घालून मिश्रण नीट हालवून पुन्हा दहा मिनिटे शिजू द्यावे. आता कीस हालवताना मऊसर लागू लागेल. साखर घालून पुन्हा दहा मिनिटे शिजू द्यावे. आंच मध्यमच ठेवावी. दूध संपूर्ण आटले की काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे व वेलदोड्याची पूड घालून एकत्र करून पुन्हा एक वाफ काढावी. गाजर हालवा गरम, रूम टेंपरेचर आणि थंड केलेला... कसाही सुंदरच लागतो.
खवा घालायचा असल्यास हाताने जरा मोडून मोकळा करून घ्यावा. स्वीटंड कंडेंन्स मिल्क घालणार असल्यास साखर आधी घालू नये. बरेचदा वेगळी साखर घालायची गरज पडतच नाही. म्हणून कंडेंन्स मिल्क घातल्यास चव घेऊन पाहिल्या शिवाय वरून साखर मिसळू नये. अन्यथा अती गोड होईल.
मायक्रोव्हेव कृती :
गाजरे किसून घेतल्यावर मोठ्या मायक्रोव्हेव सुरक्षित काचेच्या भांड्यात कीस व तूप एकत्र करून पाच मिनिटे ठेवावे. नंतर हालवून पुन्हा पाच मिनिटे. असे चार वेळा करावे. प्रत्येक वेळी मिश्रण हालवायलाच हवे. वीस मिनिटांनी दूध/ कंडेंन्स मिल्क/ खवा मिसळून पाच मिनिटे, असे तीन वेळा ठेवावे. आता मिश्रण हालवून कितपत शिजले आहे याचा अंदाज घ्यावा. छान मऊसर लागत नसल्यास पुन्हा पाच मिनिटे ठेवावे. आता त्यात काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे व वेलदोड्याची पूड घालून हालवून पुन्हा पाच मिनिटे ठेवावे. लुसलुशीत, लालसरगुलाबी तुकतुकीत गाजर हालवा तयार.
टीपा :
गाजरे घेताना ती ताजी व रसरशीत आहेत हे पाहून घ्यावे. गाजरे जर चांगली नसतील तर हालवा छान लागणार नाही.
फॅट फ्री : दूध, कंडेंन्स्ड मिल्क, इवॅपोरेटेड मिल्क यातले काहीही घातले तरी हालवा तितकाच चविष्ट होतो जितका खव्याने होईल.
तूप जास्ती घालू नये. अजिबात गरज नसते.
पारंपरिक / मायक्रोव्हेव कसाही करा, पाणी जराही घालू नका. अगदी पाण्याचा वरून हबकाही नाही. गाजराचा कीस हा संपूर्णपणे वाफेवर शिजवायचा आहे. म्हणूनच आंच कमी व झाकण ठेवून संयमाने शिजू द्यावा.
>>>तरीही थंडीत सकाळी सकाळी झोपाळ्यावर झुलत आले, गवती चहा व वेलदोडा घालून केलेला चहा कोवळ्या उन्हात शाल लपेटून पिण्यातली लज्जत भारीच!
ReplyDeleteबयो चल नासिकला :). झोपाळेही आहेत , थंडीही आणि आयता चहा मिळण्याची खात्रीही :)
बाकि हलवा भारी दिसतोय बयो .... :) :). नो निषेध , माझी आवडती डिश .....
चला तर मग जाउयाच नाशिकला. :) झोपाळा भारीच आठवण काढतोय आणि आयता चहा तय्यार वाट पाहतोय गं! :) :)
Delete>>>तरीही थंडीत सकाळी सकाळी झोपाळ्यावर झुलत आले, गवती चहा व वेलदोडा घालून केलेला चहा कोवळ्या उन्हात शाल लपेटून पिण्यातली लज्जत भारीच!
ReplyDelete+1111111111111111
धन्सं श्रध्दा! :)
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteयशोधन, ब्लॉगवर स्वागत आहे व प्रतिक्रियबद्दल आभार! :)
Deleteब्लॉग पाहते..
हलव्याचा फोटू तर जाम भारी आलाय... आज दुपारीच बीट-गाजर mix हलवा खाल्लाय... :)
ReplyDeleteधन्सं इंद्रधनू. :)
DeleteAaj duparich khalla indian buffet madhe. Nahitar khup tras jhala asata photo pahun. :P Pan thandit he sarv khaychi ichha hotech nakki. :)
ReplyDeleteSahich.
-Vidya.
हाहा ! सहीच! थंडी तब्येतीत लाड करवून घेते. ;)
Deleteधन्यू गं! :)
hindi film madhali 'gajar ka halva' banavnaari aai aathavli.
ReplyDeleteBaaki pakakruti aani photo ekdam chhaan!
cheers
Pushpa
tumhi asha chan chan...dish tayar karta aani post karta......nasta trass hoto rav...wachun aani photo pahun tondala pani sutate.....aani ha sara aabhas aahe hey lakshat aale ki man khattu hote...pan halwa akdam zakasssss
ReplyDelete