!!! दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!!
दिवाळी येणार, अंगण सजणार
दिवाळी येणार, अंगण सजणार
आनंद फुलणार, घरोघरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी !
आनंद फुलणार, घरोघरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी !
रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभात सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पा गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षा सरी,
आमच्या घरी अन् तुमच्या घरी !
सनईच्या सुरात होईल पहाट
अत्तराचं पाणी, स्नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला
आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी !
देवापाशी मागेन एकच दान
भावाच्या यशाची चढो कमान
औक्ष असू दे बळकट
नको करू ताटातूट
चंद्र ज्योती हसणार, फिक्या फिक्या होणार
भावाविण अंधार दाटे उरी,
आमच्या घरी अन् तुमच्या घरी !
गीत
|
-
| |
संगीत
|
-
| |
स्वर
|
-
| |
चित्रपट
|
-
|
बयो तुम्हालाही दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा !! येणारं वर्ष आरोग्याचं जावो ही सगळ्यात मोठी सदिच्छा !!
ReplyDeleteकोलाज आणि कविता मस्त जमल्याहेत .... :)
आभार्स !
Deleteमस्त.. :) चकल्या डोळ्यात भरल्या एकदम. :D
ReplyDelete:) :)
Deleteतुलाही खूप खूप शुभेच्छा..फ़राळ एकदम यमी दिसतोय...
ReplyDeleteअवांतर - आमचा फ़राळ केव्हाचा निघालाय तो अजून आलाच नाहीये यंदा. त्यामुळे दिवाळी बिलेटेडपण करावी लागणार बहुतेक.
पोचला का फराळ? विकांताला पुन्हा दिवाळी... :)
DeleteShree tai, mastach gaane ahe. Thanks!
ReplyDeleteमीही बर्याच वर्षांनी ऐकले हे गाणे... :)
Deleteshreetai...srujancha ank pahila ka? paha wacha aani sanga. wat pahtoy.
ReplyDeleteअरे मी अंक ओझरता चाळलाय... पण अजून वाचला नाहीये. वाचते आणि सांगते रे. :)
ReplyDeleteफार सुंदर गाणे आहे.
ReplyDeleteहो नं.. :)
Deleteधन्सं!