हे सगळे इतके सांगायचे कारण, या सहा महिन्यात माझ्या मित्रमैत्रिणींनी, ब्लॉग वाचकांनी मेल लिहून, फोन करून, टिपण्या टाकून... सतत माझ्या ’ मुक्या ’ झालेल्या ब्लॉगची-माझी आवर्जून विचारणा केली. सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. तुमचा लोभ, प्रेम आहेच... असेच राहू देत. एखादी गोष्ट फार काळ थांबली की सुरवात कुठून करायची इथे पुन्हा गाडे अडते. माझेही काहीसे असेच होतेय. हात थांबला तरी गेल्या सहा महिन्यात जीवन सुरूच होते. घटना... अॅक्शन... रिअॅक्शन... मन... विचार... खल... चर्चा... पुन्हा विचार.... थोडक्यात काय... डोक्यातल्या खोक्यात भर पडतच होती. त्यांचा निचरा न झाल्याने ’ बळी तो कान पिळी ’ ची गत येऊन ठेपली. कधीही कुठेही अचानक ’ बळीच्या ’ डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या.... तर कधी दबले हुंदके... मुसमुसणे. या सगळ्याचा गूढ काळपट हिरवा डोह होण्याआधी हातपाय मारयला हवेत ची जाणीव जोर धरू लागली.
' सॅंडी ’ ने च्यामारिकेत आल्या आल्या दणका दिला. आता ओसरलेय सारे... पुन्हा वारे पूर्ववत वाहू लागलेत. मात्र थंडीने एकदम जोर धरलाय. अधूनमधून पाऊस आणि अशक्य मळभ. म्हणजे, ’ आधीच उल्हास तश्यांत फाल्गुन मास ’. डिप्रेशन दबा धरून बसलेय.... घराबाहेर. त्याला घराबाहेरच थोपवण्यासाठी आणि डो-खोक्यात नवीन भर पडण्यासाठी कप्पे रिकामे करायला घ्यायला हवेत... तेही लगेचच. म्हणून लिहायला बसले खरी.... पण.... मनाची गती हातांना झेपेना... पुन्हा शांतता... पुन्हा प्रयत्न.... आणि अचानक बोटे वेगळ्याच वळणावर जाऊ लागली. गेले काही महिने लिखाण थांबलेले तसं गेली काही वर्षे पेन्सिलही थांबली होती. एकदम हुक्की आली, आज पुन्हा प्रयत्न करावा. जसे येईल तसे... न ढेपाळता... पांढर्यावर चार रेघा ओढाव्यातच.... लगेच कागद समोर घेतला आणि.....
पोस्ट वाचेन आणि पुन्हा कमेंटेन ... आधि मब्लॉविवर ’सरदेसाईज’ दिसल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हे पहिलं कमेंट....
ReplyDeleteवेलकम बॅक बयो !! :)
आता मी चालले पोस्ट वाचायला.....
घेतले नं मनावर... :) अमितलाही सांग गो !
Deleteबयो माझे डॉक्टर सांगतात मला नेहेमी, Worst has already been passed !!
ReplyDeleteतेच तूला सांगते मी.... जे जे काय वाईट व्हायचे होते ते होऊन गेलेय.
आता हात लिहीता , वळता झालाय त्याला थांबवू नकोस !!
बाकि काढलेले चित्र सुरेख जमलेय. जगासमोर असली तरी स्वत:च्या विश्वात रमलेली मुग्धा !! :)
धन्यू गं! अगदी अगदी... पण ते आधीचे दिवस फार छळ करुन मुंगीच्या गतीने जातात नं त्याचा असर होतो. आता लिहीण्याची सवय ठेवायला हवी. :)
Delete"सरदेसाईज"चे दणक्यात स्वागत !
ReplyDeleteआता सगळं नीट ना... मग होऊन जाऊ द्या रव्याचे लाडू ;-)
आभार्स ! हा हा... अरे पोस्ट लिहून तयार आहे. अनायसे दिवाळीच्या फराळाची जोरात तयारी होतेय... :)
DeleteShree tai, ekdam sukhad dhakka dilas bagh. Amhi saglech tula miss karat hoto. Baki lekh ani sketch surekh :-)
ReplyDeleteधन्यू धन्यू श्रीराज ! :)
Deleteवा.. आता मी देखील सिक्कीम पुन्हा सुरु करीन म्हणतो.. ;) तू टाकणार आहेस का काही सिक्कीमचे फोटो, लिखाण वगैरे?
ReplyDeleteरोहना, तू लिहीणार असशील तर मी काही फोटो आणि त्या अनुषंगाने तिथेच दोन ओळी टाकेन. :) तू घे रे लिहायला.
Deleteतसे नको. तू इथे लिही बरे. :) हवंतर संपूर्ण अनुभव म्हणून १ पोस्ट लिही. :)
Deleteस्वत:चे स्वत:ला पुन्हा गवसणे असे म्हणावे का? मन:पूर्वक शुभेच्छा!
ReplyDeleteब्लॉग मला गवसला हे ही नसे थोडके ना गं... :) धन्यवाद !
Deleteभेलक्क्म ब्याक !! अशीच लिहित राहा... भरपूर विषय आहेत तुझ्या कडे ;)
ReplyDeleteआणि चित्रकला पण????? हे माहित च नव्हतं !! सॉलिडच !!!
विषयच विषय.... ;)
Deleteहेही एक खूळ आहे रे... एकदा पेन्सील हाती आली की प्रयत्न करायचा... पुन्हा कधी ती रुसेल सांगता येत नाही नं.. :D
आज पहिल्यांदा येथे येणे झाले.
ReplyDeleteआपले पुढील पोस्ट वाचायला उत्सुक
निनाद, सुस्वागत व आभार ! :)
Deleteवाह, क्या बात है. सुंदर चित्र काढलं आहेस. तुझ्या ह्या कले बद्दल माहिती नव्हती.
ReplyDeleteआणि आता लिहिणं सुरु ठेव.
यस्स सर ! आता इतकी मोठी सुट्टी नाही. धन्यू रे! :)
DeleteWelcome back
ReplyDelete:) :)
DeleteWelcome back....
ReplyDeleteइकडच्या थंडीवर ब्लॉगिंग हा एक मस्त उतारा आहे सो लगे रहो....
धन्यवाद अपर्णा ! :)
DeleteNamaskar tai,
ReplyDeletetumhala parat blogvar pahun anand vatala.
Tumhi ajari astanamala tumhala 'tambitache laadu' karun pathavata aale aste tar chhan jhale aste,tumchya aaji naahi ka paathvat hotya tumhala taap aalyavar..tase!
Aso,asech kaahi lihit raha.ani ho diwalichya khup shubhechha!
pushpa
पुष्पा आभार्स ! :)
Deleteतापात आजीची फार आठवण आली... अगदी अचूक ओळखलेस तू.
दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा !!!
सर्वप्रथम दणक्यात स्वागत !!!आता बरी आहेस ना?
ReplyDeleteसहीच काढलय गं चित्र !!
अशीच छान छान चित्रे समोर येउ देत..