१५ सप्टेंबर नंतर ब्लॉगवर काहीच लिहिले नाही. कारण अचानक ठरलेला मायदेशाचा दौरा. अचानक ठरल्याने फार काही योजनाबद्ध, आखीव रेखीव नियोजन शक्यच नव्हते. परंतु मायदेशी जायला मिळणार होते. आता गेल्यावर किती प्रकारे आनंद भरून घेता येईलची आखणी करण्यात मन रममाण झाले. तिकीट बुक झाले आणि मन आनंदून गेले. वेळ फारच थोडा आणि कामे फार त्यामुळे ब्लॉगवर निदान आठवड्याला तरी एखादी पोस्ट यावी ही तरतूद काही करता आली नाही. थोडी रुखरुख लागली. अजिबात पोस्ट नाही असे ब्लॉग सुरू झाल्यापासून घडलेच नव्हते. पण नाईलाज होता. आठ दिवसात जमेल तितकी तयारी करून ओढीने घर सोडले. सप्टेंबरच्या शेवटी शेवटी घरात आईबाबा, वाहिनी, भाच्या व मित्रमैत्रिणींच्या गोकुळात रमले. दोन वर्षांचा दुरावा किती व कसा भरून काढू असे झालेय. नुसता दंगा मांडलाय.
तिथून निघण्याआधीच रोहनाच्या मागे लागलेले. बाबा रे, लगेच एखादा ट्रेक ठरव. नंतर तू उडनछू होशील आणि मग माझे परतायचे दिवस येतील. त्यात नवरात्र, दसरा व दिवाळीचीही धूम असणार मग ट्रेक राहूनच जाईल. रोहनने मनावर घेतले आणि ' तिकोना गडाची ' मोहीम ठरवली. येऊन फक्त चारच दिवस झाले होते व झोपेचे तंत्रही ताळ्यावर आले नव्हते. मात्र मन गडावर जाण्यासाठी आतुरलेले. अधीर झालेले. ट्रेक मस्तच झाला. एक दोनदा दमछाक झाल्याने माझा निश्चय डळमळू लागलेला. पण आका – आपला आनंद काळे हो, त्याने, "अगं ताई, थांबू नकोस. आलोच आपण " असे म्हणत म्हणत माझा उत्साह वाढवला . त्याला अनघाने छान साथ दिली आणि मला शिखरावर पोहोचवलेच.
चोवीस मावळ्यांनी फतेह केली. शिखरावरील झेंड्याला हात लागले. शंकराच्या पिंडीसमोर मस्तक टेकले. वरून आसपासचा नयनरम्य परिसर, हिरवाई डोळ्यात व मनात साठवली. त्यानंतर तिथेच सगळ्यांनी आणलेल्या एक से एक पदार्थांचा फन्ना उडवला. थालीपीठ, भाकर्या, अळूवडी, लसणाची चटणी, लाडू, मक्याचे दाणे, बटाट्याची भाजी, ठेपले, बरेच काही होते. सगळेच पदार्थ अप्रतिम व अतिशय चविष्ट झाले होतेच आणि पोटात भूक भडकलेली. त्यात मोसंबी सोलून सगळ्यांना वाटून टाकण्याऐवजी चक्क रस काढून रुमालाने गाळून अनुजाने( अनुजा सावे ) दिला. ती इतके लाड करतेय हे पाहून मीही तव्येतीत लाड करवून घेतले.
भरल्यापोटी गड उतरू लागलो आणि माझी थोडी घाबरगुंडी उडाली. पहिल्याच उतरणीला जरासा पाय सरकला तर सरळ सरळ कपाळमोक्षच होणार हे पाहून फे फे उडाली. तोच अनिकेत वैद्य मदतीला आला. मग काय अर्ध्याहून जास्त गड त्याचाच हात धरून उतरले. जेवढा आनंद शिखर गाठल्याचा झाला तेवढाच जमिनीला पाय टेकल्यावरही झाला. रोहन, आका, अनघा व अनिकेत धन्यू. पुन्हा एखादा ट्रेक करायचा का? प्लीज प्लीज...
तिकोना गडावर जवळपास सगळ्यांनी लिहिले असेलच. आणि खूपच सविस्तर व छान लिहिले असेल. त्यामुळे व भारनियमनाचा अतिरेक असल्याने कधी विजदेवी नाराज होईल याचा भरवसाच नसल्याने पोस्ट आटोपती घेते. सोबत थोडेसे फोटो जोडतेय. १५ सप्टेंबर पासून जालावर माझा वावर जवळपास शून्यच. डायल अप आणि विजेच्या तालावर निदान छोटीशी तरी पोस्ट टाकण्याचा मोह आवरत नसल्याने....
तायडे ... तिकोना ट्रेकवरची ही पहिलीच पोस्ट बरं का!!! कोणीच काहीही लिहिलेले नाही. मी पण अजून पोस्ट लिहितोच आहे... :) उद्या होईल पूर्ण. कशी आहेस तू?
ReplyDeleteनाशिकला दिवाळी ची तयारी कशी जोरात सुरू असेल ना... मी येतोय लवकरच. तू पुन्हा उडायच्या आधी भेटू एकदा... आणि हो अजून एका ट्रेकचे बघू कसे करायचे ते.. :)
मस्त झाला होता ट्रेक...परत एकदा करयला नक्की आवडेल...
ReplyDeleteमस्त फोटू आणि शॉर्ट अँड स्वीट पोस्ट.. सहीये गेल्या गेल्या ट्रेक ... मजा चाललीये तुझी एकंदरीत :) .. यंज्वाय !!
ReplyDeleteतुझी पोस्ट बघुन खुप आनंद झाला... ट्रेकला मला येण्यास जमलं नाही याचा खेद वाटतोय :(
ReplyDeleteChhaan lihile aahes..kara majjaa !!
ReplyDeleteअरे!! असं झालं का?? रोहना, मला वाटलं की सगळ्यांनी सविस्तर पोस्ट टाकली असेल म्हणून मी गड, आसपासचा परिसर, जाण्याचा मार्ग, धरण आणि येताजातांना घडलेल्या रंजक घटना विस्तृत वर्णिल्या नाहीत. असो. तू लिहितो आहेस ना... वाट पाहते.
ReplyDeleteतू ये लवकर. भेटूच पण जमले तर अजून एखादा झेंडा गाठू. :)
सागर, धन्यवाद. सहमत आहे. मस्तच झाला होता ट्रेक. रोहनला रिक्वेस्ट पाठवली आहेच... :D
ReplyDeleteहेरंब, मजाच मजा सुरू आहे. त्यातून सध्या नाशिकला आईकडे आल्याने लाडच लाड. म्हणजे ती माझे करतेय आणि मी तिचे... :)
ReplyDeleteआनंद, तुला खूप मिस केले बघ. हेरंब, विभी, तन्वी, अपर्णा तर येणार नव्हतेच ( त्यांच्या कितीही मनात असले तरी... ) पण कदाचित तू येशील असे वाटलेले. पुढच्या वेळी जमव.
ReplyDeleteउमा धन्यू गं. :)
ReplyDeleteइथे असतांना नेट वर कशाला वेळ वाया घालवते आहेस?? दुसरं बरंच काही करता येईल बघ... :) म्हणजे फिरणं< खादाडी<इतर नातेवाईकांच्या भेटी<आणि बरंच काही.
ReplyDeleteपोस्ट झॅक झाल पहा.
महेंद्र, मातोश्री तर फार आरडाओरडा करतात नेटवर जाते असं नुसतं म्हंटले तरी...:D खादाडी, भटकंती सुरू आहेच. मुंबईत आले की भेटूच रे पुन्हा. :)
ReplyDeleteवाह ताई मस्त पोस्ट...आवडली. त्या बेसनाच्या लाडवाची चव अजूनही आहे बर जिभेवर :)
ReplyDelete>>मस्त फोटू आणि शॉर्ट अँड स्वीट पोस्ट.. सहीये गेल्या गेल्या ट्रेक ... मजा चाललीये तुझी एकंदरीत :) .. यंज्वाय !!
ReplyDelete+१
श्रीताई, किती मिस करतेय तुला तर माहित आहेच...शिवाय ते भारनियमनमुळे तू साध्या मेलवर पण नसणार आणि नसलीस तरी ठीक आहे गं मजा कर..पोस्ट मस्त शॉर्ट आणि स्वीट झालीय...Hats off....फ़ोटोसुद्धा झकास आहेत....
ReplyDeleteरच्याक तिकोनावर पहिली पोस्ट योगेश (मनमौजी) ने टाकली होती....पब्लिकने वाचली असेल असं वाटतंय....
सगळ्या आठवणी गोळा करुन ठेव. परत आलीस की पुन्हा त्याच आठवणींचा आधार असतो....मी सध्या तेच करतेय...दिवाळीच्या शुभेच्छा तुला अम्मळ आधीच देतेय..
>>>> इथे असतांना नेट वर कशाला वेळ वाया घालवते आहेस?? दुसरं बरंच काही करता येईल बघ... :) म्हणजे फिरणं< खादाडी<इतर नातेवाईकांच्या भेटी<आणि बरंच काही.
ReplyDeleteपोस्ट झॅक झाल पहा.
+100
मी अगदी हेच लिहीणार होते तूला... :)
एकदा परत गेलीस की आहेच नेट, तोवर मात्र मस्त भटक आणि धमाल कर...(मी येतेच आहे :) )
भाग्यश्री, पोस्ट छान झालीय. :D मजाच आली नाही का ट्रेकला? अगं पण, आपले 'दोघीदोघीं'चे फोटो कुठेयत?? मला मेल कर ना प्लीज? :)
ReplyDeleteसुहास,धन्यू रे! पुन्हा ट्रेक झाला तर लाडूही येतीलच. :)
ReplyDeleteविभी, तुला मिस केले खूप. आता तू येशील पण मी नसेन. :(
ReplyDeleteधन्यवाद.
अपर्णा, भारनियमाने तर उच्छाद मांडला आहे. :(
ReplyDeleteमी ही मिसते आहेच तुला. योमूने टाकलेली पोस्ट वाचेन आता परत आले की. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा! आरूषला खूप पापे.
तन्वी, ये लवकर. मी वाट पाहते आहे. बाकी भटकंती, गाण्याच्या मैफिली आणि खादाडी जोरो शोरों पें हैं। :) परत गेले की जाल की जाल में वापसी होनी ही हैं... :D
ReplyDeleteअनघा, खरेच. ट्रेक सहीच झाला. तुला फोटो मेल केलेत गं.
ReplyDeleteछान छोटीशी पोस्ट झालीये ताई ...त्या कमानीचा फोटो बघून वाटत कि " अरे आत्ताच तर आपण इथे बसून गप्पा मारत होतो " पुढल्य ट्रेक ला नक्कीच भेटू ..
ReplyDeletegood job ....hava changli ahe towar ajun ek trek karun ghe.
ReplyDeleteatta Zionla gelyawar asech watat hote ajun ek tari trek karawa
pustakanchi yadi nelis ki nahi?
enjoy
खूपच धमाल आली गं ट्रेकला. आले की बोलूच. :) थंडी सुरूही झाली ना? :( माधुरी, जरा प्लीज तुझ्याकडे पुस्तकांची यादी असेल तर पाठव ना... माझ्याकडेही आहे पण कदाचित काहितरी नजरेतून सुटेल म्हणून... धन्यू गं.
ReplyDeleteसागर, हो ना. अगदी डोळ्यासमोर आहे सारे. ट्रेक नाही तरी आउटिंग तरी होऊ घातलेय. भेटूच... :)
ReplyDelete