जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, February 19, 2009

कथा गर्दीची

चुकता वाजणारा गजर आजही वाजला. सकाळचे सहा वाजत होते. पाच मिनीटांनची डुलकी गेल्याच आठवड्यातलेटमार्क देऊन गेली होती. बाप रे! नकोच ती आठवण सकाळी सकाळी असे म्हणत शमा उठली. सात वाजेतोलेकाला उठवून, लाडीगोडी लावीत कसेबसे आवरून शाळेत पाठविले. तो आनंदाने जाणे तिच्या दिवसभराच्यामन:शांतीसाठी गरजेचे होते. नवऱ्याला उठवून चहा देत ती एक डोळा घड्याळाकडे ठेवीत भराभर कामे आवरतहोती. आठ-वीस ला ती दोघेही बाहेर पडली. चला आज वेळेवर ऑफिसला पोहचणार ह्याची खाञी पटली. रिक्शाकरून स्टेशन गाठलें. एक कान अनाँन्समेंटकडे ठेवीत ब्रीज चढताना तिच्या लक्षात आले की काहीतरी गडबडदिसतेय. तेवढयांत एक लोकल आली. चला सुटले. ऊगाच घाबरलो आपण. दुसऱ्यांच क्षणी हे सुख हिसकून घेतलेत्या अनॉन्सरच्या दिलगिरीच्या शब्दांनी. ती लोकल तिन तास उशिरा अवतरली होती. सगळ्यां प्लॅटफॉर्मस वरचीगर्दी पाहून तिच्या आनंदाचे बारा वाजलेच होते, किमान बारा वाजेतो तरी पोहोचता आले तर बरे होईल असे मनाशीम्हणत ती चार नंबरवर उतरली. प्रत्येकवेळी तेवढयाच हिरिरीने ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नांना अखेरीस यश येउनरडतखडत एक वाजता सेक्शन मध्ये पोहोचली. युद्ध खेळल्यामुळे सकाळच्या छान आवरण्याचा पुरता अवतारझाला होता. सेक्शनमध्ये मधोमध साहेब उभे होते. तिच्या आधी पाच/दहा मिनीटांच्या फरकानी इतर कलिग्जयेऊन पोहोचले होते. साहेब त्या सगळ्यांनची चंपी करित होते. हाणामारी करून कसेबसे येऊन टेकलेल्या साऱ्यांनाजाम वैताग आला होता. तिला पाहताच सगळयांनी हिला विचारा म्हणत कल्ला केला. साहेबांचा माझ्यावर अमंळजास्तच विश्वास आहे, असा बऱ्याच जणांचा गोड गैरसमज होता आणि असुयापण. साहेबांचा मोहरा तिच्याकडेवळताच अभावितपणे शब्द गेले , तर काय! इतकी गर्दी होती की माझे डोळेसूद्धा चेंगरले. दोन मिनीटे भीषणशांतता पसरली आणि एकदम सगळे जोरजोरात हसू लागले. साहेबांनी धन्य आहात असे हातवारे करितसगळ्यांना मस्टर दिले आणि चहा मागविला. पहा बाई, खरे बोलले तर .........

2 comments:

  1. प्रिय भानस, तुझ्या ब्लॉगला फक्त दोन वर्ष झाली हे मनाला काही पटत नाही. याच कारण म्हणजे तुझा लिहीण्याचा झपाटा. सुरुवातीचा उत्साह म्हणावा तर अजुनही तोच कायम आहे... कस काय जमतं ते. तुझ्या लिहीण्याच जेथुन सुरुवात झाली त्यातच ही प्रतिक्रिया मुद्दाम देतोय. सुरुवात लेटमार्कने केली आहेस पण तो लेटमार्क आता तुझ्या दररोजच्या आयुष्याचा भाग नाही. तस असलं तरी माणुस जगतो तो आठवणींवर आणि वागतो तो त्यातील अनुभवां नुसार. त्यामुळे मागे वळुन पाहात केलेली सुरुवात आता पुढचा वेध घेत अशीच चालु राहावी याच शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. मैत्रेया,अनेक धन्यवाद. खरे तर इतका औपचारिकपणा दाखवायला नको वाटते... :) पण तू या पोस्टवर अभिप्राय दिलास, खूप भावले.

    आठवणींचे भांडार ठासून भरलेयं खरे. आणि बरेचदा ते केवळ माझे असलेले आयुष्यही खूप हवेसे वाटते... असो. निदान आठवणी तरी आहेत ना... :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !