जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, November 13, 2012


 
!!!   दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा   !!!
 
 
 
 
दिवाळी येणार, अंगण सजणार
 
 
दिवाळी येणार, अंगण सजणार
आनंद फुलणार, घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !


रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभात सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पा गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षा सरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
 

सनईच्या सुरात होईल पहाट
अत्तराचं पाणी, स्‍नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला
आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
 

देवापाशी मागेन एकच दान
भावाच्या यशाची चढो कमान
औक्ष असू दे बळकट
नको करू ताटातूट
चंद्र ज्योती हसणार, फिक्या फिक्या होणार
भावाविण अंधार दाटे उरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !गीत
-
संगीत
-
स्वर
-
चित्रपट
-
 
 
 

12 comments:

 1. बयो तुम्हालाही दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा !! येणारं वर्ष आरोग्याचं जावो ही सगळ्यात मोठी सदिच्छा !!
  कोलाज आणि कविता मस्त जमल्याहेत .... :)

  ReplyDelete
 2. मस्त.. :) चकल्या डोळ्यात भरल्या एकदम. :D

  ReplyDelete
 3. तुलाही खूप खूप शुभेच्छा..फ़राळ एकदम यमी दिसतोय...
  अवांतर - आमचा फ़राळ केव्हाचा निघालाय तो अजून आलाच नाहीये यंदा. त्यामुळे दिवाळी बिलेटेडपण करावी लागणार बहुतेक.

  ReplyDelete
  Replies
  1. पोचला का फराळ? विकांताला पुन्हा दिवाळी... :)

   Delete
 4. Replies
  1. मीही बर्‍याच वर्षांनी ऐकले हे गाणे... :)

   Delete
 5. shreetai...srujancha ank pahila ka? paha wacha aani sanga. wat pahtoy.

  ReplyDelete
 6. अरे मी अंक ओझरता चाळलाय... पण अजून वाचला नाहीये. वाचते आणि सांगते रे. :)

  ReplyDelete
 7. फार सुंदर गाणे आहे.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !