) की पूर्ण कंट्रोल सी कंट्रोल वी मारलाय का याची जबर उत्सुकता निर्माण होते. एक बरे आहे की बॉलीवूड डोक्याला फारसा ताप देतच नाही. अगदी शेवटची वीट पडण्यापर्यंत तंतोतंत कॉपी.
( मेट्रिक्स ) काही वेळा चोऱ्या करूनही अपवादात्मक सुंदर सिनेमेही बेतले गेलेत. विकांताला जमलेल्या मैफलीत एकदा का ही चर्चा छेडली गेली की रात्र संपेल पण यादी संपायची नाही... नुसती धमाल.जे सिनेमांचे तेच संगीताचेही. मोठ्या मोठ्या दिग्गज संगीतकारांनीही जेव्हां सातत्याने या चोऱ्या केल्याचे समोर येते तेव्हां खरेच हळहळ वाटते. मनावर छाप सोडणाऱ्या अनेक गाण्यांमागची डिट्टो मारलेली कॉपी ऐकली की त्या गाण्याची मोहिनीच संपून जाते. अगदी साठच्या दशकापासूनच हा खेळ सर्रास चालू झालेला दिसून येतो. आपल्याकडे ज्या काळाला आजही चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ म्हटले जात , त्यातली काही अजरामर गाणी शब्द वगळता जशीच्यातशी उचललेली आहेत. कुछ तो बदला होता यार!
बरं असे नाही की आपल्यापाशी क्षमता, कुवत व बुद्धिमत्ता नाही. म्हणून अजूनच वाईट वाटते. एकच सुख की या चोरलेल्या चालींवर अतिशय सुंदर व नेमकी शब्दयोजना केली गेली. शिवाय चित्रपटात समयोचित ठिकाणी वापरल्याने ठिगळं वाटत नाहीत. प्रसंग, भावनांच्या गरजेची नस ओळखून चपखल बसलीत. आपल्या प्रेक्षकांची त्या त्या दशकानुसार बदलत जाणारी मानसिकता अचूक हेरत या मारलेल्या कॉप्या पर्फेक्ट पेरल्या गेल्यात. कदाचित म्हणूनच चोरलेली असली तरी इतकी प्रचंड गाजलीत. आजही तितकीच भुरळ घालतात.बाकी काहींनी संपूर्ण चित्रपट तर कॉपी पेस्ट मारलेत, पण तेवढ्यावरच त्यांचे पोट न भरल्याने त्यातली गाणीही कॉपी पेस्ट मारली. कदाचित त्यावेळी, आडात काहीच नसावे मग पोहऱ्यात येणार कुठून ? मरो, कोण ताप करून घेणार. ऐसेभी आख्खा मूव्ही छाप रहे हैं ना, गाने भी कहींसे उठा लो यार! ऐसा न हो हम वरिजनल के पिछे भागते रह जायेंगे और उधर साला दुसरा कोई, मूव्ही रिलीज भी कर देगा!

अश्या सिना ठोकके केलेल्या काही चोऱ्यांचे मूळ गाणे व बेतलेले गाणे सोबत जोडलेय. गंमत म्हणजे दोन्हीही तितकीच भावतात.
वरून १९५८ साली आलेल्या, " चलती का नाम गाडीतले " दिग्गज : एस डी बर्मन यांचे,
इतके आवडते गाणे पण प्रत्येक वेळी ऐकताना बॅगराउंडला वॉटरमेलन वाजत राहते....
पोलिश फोक
वरून " मधुमती " मधले, दिग्गज : सलिल चौधरी यांचे अजरामर गाणे,
अख्खा मेमरी का वाट लगा दिया ...
एल्विस प्रेस्ली चे
वरून " झुक गया आसमाँ " मधले, शंकर जयकिशनचे ,

कसला आत आत उतरत जाणारा आवाज आहे तिचा... अप्रतिम!
वरून " यादों की बारात " मधले जबर गाजलेले, दिग्गज : आर डी बर्मन चे,
ची मोहिनी आजही तितकीच!
वरून " सी आय डी (१९५६ ) " मधले, दिग्गज : ओ पी नय्यर यांचे,
जॉनी वॉकर, रफी व गीता दत्त के क्या कहनें...
Elvis Presley , " The Yellow Rose of Texas "
वरून " आ गले लग जा " मधले, दिग्गज : आर डी चे,
या गाण्याबद्दल काय बोलावे...
अक्षरशा: तंतोतंत कॉपी केली आहे आर डी ने, तरीही मेहबुबा मेहबुबा चा जबर पगडा आजही कायम आहेच.
पण खरे मार्क्स द्यायला हवेत ते Demis Roussos ला
सिनेमा चोरलाच पण त्याने पोट भरले नाही म्हणून गाणेही....

" क्रिमिनल " मधले,
क्लिफ्फ़ रिचर्ड चे,
वरून " लगे रहो मुन्नाभाई " मधील, शंतनु मोइत्रा चे,
भप्पीदांचे , " हरी ओम हरी " , " कोई यहां नाचे नाचे... " आणि अनू मलिकके क्या कहनें! यादी भली मोठी आहे. असाही तो दिग्गजांमध्ये मोडतही नाहीच म्हणा...

