जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, July 12, 2009

बोलके भाव....

बस करो अभी

सही तंद्री

परफेक्ट सहकार

सख्खे शेजारी

हळदीकुंकू

अरे अरे सांभाळ ...

ही सगळी चित्रे बऱ्याच जणांनी आधीही पाहिली असतीलच. श्री. एस. फडणीस यांची ही कार्टून्स आहेत. फडणिसांची स्वत:ची खास शैली आहे. रोजच्या जीवनातील उदाहरणे अतिशय सिंपल स्टाइलने, साधेच रंग-कागद वापरून प्रस्तुत करत. खास मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या मनाच्या जवळ जाणारी ही काही कार्टून्स. ट्रॅफिक जॅम मध्ये सापडल्याने तिथेच हळदीकुंकू देणाया या दोघी, सिनेमा व गॉसिपने भारलेली तरुण आई वा शेजाऱ्यांचे सामंज्यस.... किती साधे तरीही नेमके.श्री.शिवराम दत्तात्रय फडणीस. १९५२ सालापासून फडणीस सर मोहिनी चे मुखपृष्ठ बनवित आहेत. बहुतांशी मोहिनीतच त्यांची सुंदर काळानुरूप व आपल्या सर्वांशी निगडीत घटना, गोष्टी...व्यंगचित्रे पाहीलीत. जून २००१ मध्ये त्यांना ’Life Time Achievement Award'ने गौरवले.
अप्रतिम.

8 comments:

  1. मस्त आहेत कार्टून्स. मी नव्हती पाहिली आधी ... :)

    ReplyDelete
  2. बस करो अभी.. तर अप्रतिम.. फार जुनं आहे हे कार्टून. मला वाटतं आवाज मधे आलं होतं ? मस्त आहेत सगळी..

    ReplyDelete
  3. फारच छान चित्रे आहेत. हा विषय निवडल्याबद्दल आभार! यांची कला सहसा कुठल्या पेपरमधून किंवा मासिकातून प्रकाशित झाली आहे? श्री फडणीस यांचे नाव शि द फडणीस असे आहे का?

    पुन्हा एकदा आभार.

    ReplyDelete
  4. रोहन...:)

    महेंद्र, आवाज नाही मोहिनी मध्ये.:)

    Anonymous,श्री.शिवराम दत्तात्रय फडणीस. १९५२ सालापासून फडणीस सर मोहिनी चे मुखपृष्ठ बनवित आहेत. बहुतांशी मोहिनीतच त्यांची सुंदर काळानुरूप व आपल्या सर्वांशी निगडीत घटना, गोष्टी...व्यंगचित्रे पाहीलीत. जून २००१ मध्ये त्यांना ’Life Time Achievement Award'ने गौरवले.
    अप्रतिम.

    ReplyDelete
  5. मस्त.... माझ्या बालपणी कुमार आणि किशोर ही दोन मासिके यायची... त्यात पण कधिकधी शि.द.फडणिस ह्यांची चित्रं असायची...

    ReplyDelete
  6. होय रोहिणी, मीही कधीकधी किशोरमध्ये पाहिलीत फडणीस सरांची चित्रे. धन्यवाद.

    ReplyDelete
  7. apratima !! majhya kade ahe hyanche pustak..khup mast watate kadhihi pahayala..[:)]

    ReplyDelete
  8. shi. da. mule ganitasarakha vishayat suddha maja vatayachi :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !